About Association
१९९४ रोजी पार्ले महाविद्यालयाचे साठये महाविद्यालय असे नामकरण करण्यात आले. साठये महाविद्यालयाचा मराठी विभाग आणि मराठी वाङ्मय मंडळ हे महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा भाग आहे. डॉ.व.दि. कुळकर्णी , डॉ.सदा क-हाडे, प्रा.दिंगबर पाध्ये, प्रा.उर्मिला गानू, प्रा. वि.रा. जोग हे मराठी साहित्य-समीक्षा क्षेत्रातील दिग्गज मराठी विभागात कार्यरत होते. मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना १० नोव्हेंबर १९६१ साली झाली. रा.मि.जोशी यांनी या मंडळाचे उद्घाटन केले. पुढे या वाङ्मय मंडळात श्री.विजय तेंडूलकर, डॉ. श्रीराम लागू ,श्री. किशोर कदम, श्री.वामन होवाळ यांसारख्या अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली. गेल्या साठ वर्षात मराठी वाङ्मय मंडळाने अतिशय अभिनव आणि दर्जेदार उपक्रम,कार्यक्रम सादर केले.
डॉ सदा कऱ्हाडे हे या मंडळाचे प्रथम अध्यक्ष होते. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांनी यशस्वीपणे अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना या वाङ्मय मंडळाला महाराष्ट्रात विशेष कीर्ती मिळवून दिली मराठी भाषा, मराठी साहित्य व साहित्यिक त्याचबरोबर लोकसाहित्य, बोलीभाषा यांची जपणूक व संवर्धन करणारे कार्यक्रम हाती घेतले. हाच वारसा आजतागायत अव्याहतपणे सध्या कार्यरत असणारे मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष प्रा. समीर जाधव आहेत.
Events Gallery

